Slide 1 of 1 

दुर्दैवी ! चेंबर साफ करताना तीन सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
- सोसायटीचे चेंबर साफ करत असताना तीन सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
- वाघोलीतील मोझे कॉलेज रोडवर असणाऱ्या सोलासिया सोसायटीच्या फेज दोनमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
- नितीन प्रभाकर गोंड ( वय ४५), गणेश भालेराव (वय २८) सतीशकुमार चुडाहरी ( वय ३५ ) अशी या मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
- पोलिस व अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हि घटना सकाळी ६ च्या सुमारास घडली, सोसायटीतील ड्रेनेजच्या सफाईचे काम हे तीन कर्मचारी करत होते.
- चेंबरमध्ये असलेल्या विषारी वायुमुळे तिघेही बेशुद्ध पडले, सोसायटीतील नागरिकांनी याची माहिती तातडीने अग्निशमन विभाग आणि पोलिसांना दिली.
- पीएमआरडीए वाघोली अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होत सफाई कर्मचाऱ्यांना बाहेर काढले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Tags:
1
393 Views