Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
15 Sep, 4:30 PM
more-icon

Crime News स्वयंसेवी संस्थेच्या महिलांचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे, दि. 15 ः एक स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या महिलेसह दोघींचे अपहरण करून 17 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रदीप प्रभाकर नलावडे (वय 38, रा. भूगाव, पुणे), अक्षय मारुती फड (वय 24, रा. वारजे, पुणे), बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (वय 45, रा. उत्तमनगर, पुणे) आणि अमर नंदकुमार मोहिते (वय 39, रा. एरंडवणा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव भास्कर पोखरे (वय 32, रा. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. उत्तमनगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने ही दमदार कारवाई केली. हा प्रकार उत्तमनगर मधील देशमुख वाडी येथे 13 सप्टेंबर रोजी रात्री सात ते 14 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडलेला आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार वैभव पोखरे यांची आई मीनाक्षी भास्कर पोखरे या जागृती सोशल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. रेल्वे स्थानकात त्यांना स्टॉल मिळून देतो असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते. मात्र, स्टॉल मिळून दिल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातून आरोपींनी मीनाक्षी कोकरे व त्यांच्या सहकारी महिला मनीषा पवार यांना उत्तमनगर मधील रुद्र हॉटेल जवळ चर्चा करण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांना त्याठिकाणी मारहाण करून गाडीत बसून त्यांचे अपहरण केले. आरोपी मोहोळ यांच्या घरी नेऊन संबंधित दोन्ही महिलांना डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. तसेच तक्रारदार यांना फोन करून आरोपींनी 17 लाख रुपये आणून दे नाहीतर तुला व तुझ्या आईला जीव ठार मारण्याची धमकी दिली. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सहाय्यक फौजदार विजय गुरव, पोलिस अंमलदार प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंखे, संग्राम शिंगारे, शंकर संपते, सचिन आहिवळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, अशा कोळेकर यांच्या पथकाने ही दामदार कामगिरी केली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km