Slide 1 of 1
"श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला होता.." काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ !
महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला होता असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केलेलं आहे. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असं वक्तव्य पाटील यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्या मोहसिना किडवई यांच्या जीवनचरित्र प्रकाशन सोहळय़ात शिवराज पाटील बोलत होते. शिवराज पाटील यांच्या विधानानंतर वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर टीका होत आहे.
शिवराज पाटील यांच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मुस्लीम मतांसाठी किती शेणार खाणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे. "शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्या राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला, तुकडे-तुकडे गँगचं समर्थन केलं, त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही.." अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
Tags:
2
128 Views