Slide 1 of 1
Political News रोहिदादांचा आरोप.... अजितदादा गटाकडून आमदारांचं ब्लॅकमेलिंग होतंय
अशोक बालगुडे
मुंबई, दि. 22 : प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातले प्रश्न सुटावेत, यासाठी त्याला निधीची आवश्यकता असते. मात्र, अमुक एक काम होण्यासाठी किंवा निधी पाहिजे असेल, तर आम्हाला पाठिंबा दे, प्रतिज्ञापत्रावर सही कर, अशी ब्लॅकमेलिंग अजित पवार यांच्या गटाकडून होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्याचसोबत अजित दादा गटाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या आमदारांवर विविध मार्गाने दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, खरंच अजितदादांना कुणी प्रतिज्ञापत्र देऊन त्यावर स्वाक्षरी केली आहे का? हे पाहावं लागेल. पण तुम्ही सही करत नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही, असं सांगितलं जात असल्याचं आमच्या कानावर आलंय. अशा पध्दतीने आमदारांचं ब्लॅकमेलिंग होत आहे. मतदारसंघातले प्रश्न सुटावेत, विकासासाठी निधी मिळावा म्हणून आमदार धडपड करत असतात. पण कामे मार्गी लावायची असतील, निधी पाहिजे असेल तर आमच्याकडे या, अशा पद्धतीने दादा गटाकडून ब्लॅकमेलिंग सुरू आहे. आता जरी त्यांच्याकडे मोठा आकडा दिसत असेल पण निवडणुका येतील तेव्हा त्यांना कळेल खरंच किती लोक त्यांच्या सोबतीला राहतायेत, असं सूचक वक्तव्यही रोहित पवार यांनी केलं.
Tags:
52 Views
Like
Comment
Share