Slide 1 of 1 

Ayurveda Medicines : आयुर्वेद औषधांच्या गुणवत्ता साठवणूक महत्त्वाची
डॉ. देशमुख ः सावंत फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली प्रक्रिया
उंड्री, ता. १२ ः आयुर्वेदिक औषध बनविण्याच्या पद्धती व त्याचे उपयोग, औषधाची गुणवत्ता तपासणी व साठवणूक या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच औषध प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती जेजुरी (ता. पुरंदर) येथील साई वेद फार्मा आयुर्वेदिक कंपनीचे संचालक डॉ. जालिंदर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कंपनीचे अधिकारी खुशबू शेख, सीमा यादव, पूजा मुळीक यांनी विद्यार्थ्यांना औषध प्रक्रियेविषयी माहिती दिली.
हांडेवाडी रस्ता येथील जयवंतराव सावंत डिप्लोमा फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या मुलांचा अभ्यास दौरा हडपसरमधील अक्षय ब्लड बँक आणि जेजुरी येथील साई वेद फार्मा कंपनीमध्ये आयोजित केला होता. या अभ्यास दौऱ्यात ६८ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
या अभ्यास या अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान सदर विद्यार्थ्यांनी हडपसर येथील अक्षय ब्लड बँकेमध्ये चालणारे कामकाजाची माहिती, रक्तदात्याची शारीरिक तपासणी, हिमोग्लोबीन व रक्तगट शोधणे, रक्त तपासणी, रक्त जतन, रक्तगटाची विभागणी, याविषयी अक्षय ब्लड बँकेच्या अधिकारी उत्तम पाटील यांनी माहिती दिली , तसेच,
संचालक डॉ. वसंत बुगडे, संजय सावंत, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले होते. प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. पल्लवी शेळके प्रा. अनुराधा पाटील, प्रा. कोमल भोसले, प्रा. सुरेखा शेगर, प्रा. निकिता कोलते व प्रा. सागर सोनार यांनी अभ्यास दौऱा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Tags:
4
80 Views