Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
15 Sep, 4:38 PM
more-icon

Suicide News नाशिक हादरलं.... पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ः नाशिक, दि. 15 : पतीचे अनैतिक संबंध आणि सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. अनिता गोठे (वय २९) असं मृत पत्नीचं नाव आहे. पती, सासू आणि पतीची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नाशिकच्या सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, पतीचे अनैतिक संबंध असताना, पतीने पत्नीला वेळोवेळी मारहाण करत धमकी दिली. पत्नीला माहेरच्यांकडून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादाही लावला. या मानसिक तसेच शारीरिक छळामुळे पत्नीने राहत्या घरात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले. उपचारादरम्यान पत्नी अनिता गोठे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती पंकज एकनाथ गोठे, सासू बेबी एकनाथ गोठे (रा. विशाल पार्क, माऊली लॉन्स, डीजीपी नगर) तसेच पंकजची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मयत अनिता गोठे हिच्या कुटुंबीयांनी बुधवारी अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. मयत अनिता गोठे यांचा भाऊ नितीन सीताराम निर्भवणे यांनी अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेला २०१४ पासून ते २०२३ पर्यंत त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पतीच्या अज्ञात प्रेयसी विरोधात देखील तक्रार देण्यात आली असून तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km