Slide 1 of 1 

"मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं ऐकतोय, आणि.." भाजप नेत्याचं सूचक विधान !
उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर सध्या पक्षात नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अलीकडेच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेते आशिष शेलार यांच्या पॅनलमध्ये नार्वेकर यांचा समावेश होता.
नार्वेकरांनी आज केलेल्या ट्विटनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज ( २२ ऑक्टोबर २०२२ ) वाढदिवस आहे, मिलिंद नार्वेकरांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावरून शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं असून भाजप नेते गिरीश महाजन यांनी या संदर्भात मोठं विधान केलेलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले आहेत की, "मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मी ऐकतोय. अमित भाईंशी त्यांचे चांगले संबंध आहेत, मी जे ऐकतोय त्यानुसार ते पक्षावर नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहिलं आणि कोण जाईल हे सांगता येत नाही.."
महाजनांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असून उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरचं ठाकरेंना सोडचिट्ठी देतील का अशी चर्चा सुरु आहे.
Tags:
1
188 Views