Slide 1 of 1
Pune News नवरात्रोत्सव अध्यक्षपदी ढमढेरे, तर कार्याध्यक्षपदी मोरे हडपसर पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना
नवरात्रोत्सव अध्यक्षपदी ढमढेरे, तर कार्याध्यक्षपदी मोरे
हडपसर पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना
पुणे, दि. 22 ः हडपसरमधील पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवच्या अध्यक्षपदी हेमंत ढमढेरे, तर कार्याध्यक्षपदी अनिल मोरे यांची निवड करण्यात आली. वार्षिक कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी संस्थापक कार्यकारणी अध्यक्ष बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष शैलेंद्र नवले, उपाध्यक्ष प्रीतम बडदे, सचिव राजेंद्र तुपे यांच्यासह हडपसर परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारिणी- उपाध्यक्षपदी दयानंद राऊत, राजेंद्र गायकवाड, खजिनदार- राजेंद्र तुपे, सचिव- सुमंतराव तुपे, उत्सवप्रमुख- मारुती भुजबळ, मिरवणूक प्रमुख निलेश मानकर, मंडप व्यवस्था बिराजदार मामा, गलांडे मामा, सावता मामा, प्रसिद्धीप्रमुख- सुशील भिसे.
नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत ढमढेरे म्हणाले की, हडपसरमधील नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भाजीपाला व्यापारी, कष्टाकरी या उत्सवात मोठ्या हिरीरीने सहभागी होतात. सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्याध्यक्ष अनिल मोरे म्हमाले की, पंडित जवाहरलाल नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव सर्वसामावेशक आहे. उत्सव साजरा करताना सर्वधर्म समभाव जोपासला जाईल, उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share