Slide 1 of 1
Crime News सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुण्याच्या कोंढव्यातील अजमेर पार्कमधील घटना
पुणे, दि. 15 ः सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. फरजीन मोसीन शेख (वय 35, रा. कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मोसीन अस्लम शेख (वय 38), शीरीन अस्लम शेख (वय 35), शाहीन अस्लम शेख (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जाहीद शेख (वय 40, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील अजमेर पार्कमध्ये घडलेली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोसीन आणि फरजीन यांचा 2007 मध्ये निकाह झाला होता. त्यानंतर सासरी नांदत असताना मोसीन आणि त्याच्या बहीणी फरजीनला त्रास देत होत्या. तिला वेळोवेळी शिवीगाळ करुन हाताने मारहाण करीत होत्या. त्यांच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून फरजीनने 13 सप्टेंबरला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एच.एच. शेख पुढील तपास करीत आहेत.
Tags:
Like
Comment
Share