Slide 1 of 1 

शिंदे - फडणवीस - ठाकरेंच्या भेटीवर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे प्रमुख राज ठाकरे हे तिन्ही नेते शिवाजी पार्कातील दीपोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्याने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. या तिन्ही पक्षांच्या युतीची लवकरच घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
शिंदे - फडणवीस व ठाकरेंच्या या भेटीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. बारामती येथे दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी या तिन्ही नेत्यांच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला असता पवारांनी यावेळी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, "त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे.." असं विधान अजित पवारांनी केलं आहे.
"खरंच युती केली असेल तर ती जाहीर करा, छुप्या पद्धतीने राजकारण करू नका.." अशी प्रतिक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली होती. तर दुसरीकडे तिन्ही पक्षांकडून याबाबत जाहीर टिप्पणी करणं टाळलं जात असलं, तरी युतीबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असं उत्तर येत आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना पूर्णविरामही देण्यात आलेला नाही.
Tags:
1
135 Views