Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
29 Oct, 8:35 PM
more-icon
PreviousNext

मांजरीमध्ये गॅसच्या स्फोटात दोघे जखमी

मांजरीमध्ये गॅसच्या स्फोटात दोघे जखमी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गोडाऊन मालकावर गुन्हा अशोक बालगुडे पुणे, दि. 29 ः घरगुती गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीमध्ये बेकायदेशीर गॅस भरताना झालेल्या स्फोटामध्ये आज (रविवार, दि. 29 ऑक्टोबर) दोन कर्मचारी जखमी झाले. प्रेम राव शेख (वय 47, रा. हांडेवाडी, हडपसर) आणि रमेश रतन कुरुमकर (वय 29, रा. विघ्नहर्ता पार्क, गवळी वस्ती, मांजरी) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मांजरी बु।। (ता. हवेली) येथील बेल्हेकरवस्ती येथील गोडावूनमध्ये घडली. मांजरी येथे बेल्हेकर वस्तीमधील एका गोडाऊनमधे आग लागल्याची माहिती मिळताच काळे बोराटेनगर, हडपसर, बी. टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र येथून तीन अग्निशमन वाहने व मुख्यालयातून एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. शिवतेज गॅस सेल्स सर्व्हिसेसच्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गोडावूनला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करुन सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या ठिकाणी सहा छोटे सिलेंडर फुटल्याचे आढळून आले. मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमधे गॅस भरताना आग लागल्याचे निदर्शऩास आले. पोलिसांनी सांगितले की, मांजरी बु।। येथील बेल्हेकरवस्तीमधील गोडावूनमध्ये भारत गॅसच्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोडावून मालक सुमित सुनील घुले (वय 40, रा. वृंदावन सोसायटी, बेल्हेकरवस्ती, मांजरी बु।।, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असून, त्याला ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस करीत आहेत.
Tags:  
205 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km