Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
27 Oct, 5:29 PM
more-icon

नवरात्रोत्सवात वंचित घटकातील महिलांचा आनंद केला द्विगुणित

योगेश गोंधळे ः नऊ दिवस राज्यभरातील गरजू महिलांना दिल्या साड्या अशोक बालगुडे पुणे, दि. 27 ः समाजातील दुर्बल घटकांबरोबर सण-उत्सव साजरा करण्याचे समाधान काही औरच असते. याच भावनेतून हडपसरमधील अस्तित्व कला मंचने नवरात्रोत्सवामध्ये यावर्षी समाजातील गरजू महिलांना नऊ दिवस साड्या देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केल्याचे संस्थापक अध्यक्ष योगेश गोंधळे यांनी सांगितले. अस्तित्व कलमंचच्या वतीने नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस कचरा वेचक महिला, भिक्षेकरी महिला, जोगवा मागणाऱ्या, तृतीयपंथी, फुगे विक्रेता, पोतराज, देवदासी, वृद्धाश्रमातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे सदस्य योगेश गोंधळे म्हणाले की, फेसबुक, व्हाट्सअप द्वारे आव्हान करून या साड्यांसाठी मदत घेतली. त्या माध्यमातून पुणे शहर नाही, तर पंढरपूर, अकोला सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, बेळगाव अशा अनेक ठिकाणी साडी महोत्सव अस्तित्व कलमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी आनंदी वास्तू चे आनंद पिंपळकर यांची विशेष मदत लाभली . डॉ. अश्विनी शेंडे, अश्विनी सुपेकर, श्रुतिका चौधरी श्रीकृष्ण भिंगारे, हर्षल पवार, दीपक कुदळे यांनी कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बॉबी कारणांनी यांचा व्हीं.एन.डब्ल्यू.सी. ग्रुप, लक्ष्मी घुले, रेणुका पवार, वैशाली वाघमारे, माधुरी फुलपगार, वैशाली पाटील, तारका अर्बन निधी, ज्ञानेश्वर जळगावकर, आदित्य भाडळे, राहुल व्यवहारे, सोनाली ओव्हाळ, कोमल मेहत्रे, मधुरा शेंडे, धनश्री कुलकर्णी, रूही चव्हाण, अलका गुजनाळ, हेमांगी ठाकूर, निकिता वाघमारे, वर्षा शिंदे, नंदिनी पवार, नंदिनी पणेकर, आशू घाटे, विजया घुले, कविता लोणारे, नॉयला कांबळी यांचे सहकार्य लाभले.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km