Slide 1 of 1
घेणारच... मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यलायासमोर मराठा टायगर फोर्सची भूमिका
अशोक बालगुडे
पुणे, दि. 27 ः मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, अशा घोषणांनी हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालय परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत हडपसरमध्ये रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) रोजी सकाळी ससाणेनगर ते हडपसर असा मराठा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये तमाम मराठा बांधवांनी सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठीची भूमिकेला आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा दाखवून द्यायचा आहे, असे मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी 5केएमशी बोलताना सांगितले.
यावेळी महाविद्यालयीन तरुण म्हणाले की, शिष्यवृत्ती, नोकरी ते प्रमोशनसाठी मराठा समाजाला डावलले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांनी सभा अथवा मेळावे घेऊ नयेत. जर कोणी घेतले, तर त्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने बंद पडणार असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ॲड. उदय जाधव म्हणाले की, सर्वच मराठी बांधवांना जमीन-जुमला, शेती आहे असे नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठ्यांचा मुलांकडे गुणवत्ता असूनही त्यांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांनी व्यक्त केली.
Tags:
Like
Comment
Share