Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
27 Oct, 4:44 PM
more-icon

खंडणी.... व्यावसायिकाला दरमहा दहा हजार रुपये मागणारे जेरबंद

खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार ः अशोक बालगुडे पुणे, दि. 27 : इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. निखिल शिवा कांबळे (वय १९). अतुल अनिल धोत्रे (वय २१), तेजस शिवाजी विटकर (वय २१, तिघे रा. वडारवाडी, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यंची नावे आहेत. शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार व्यावसायिकाच्या कामगारांकडून पांडवनगर भागात इंटरनेट केबल टाकण्याचे काम करण्यात येत होते. आरोपी कांबळे, धोत्रे, विटकर यांनी कामगारांना धमकावले. या भागात काम करायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यावसायिक तेथे आला. व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली. या भागात आमच्या परवानगीशिवाय कोणी काम करत नाही. या भागात काम करायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे आरोपींनी त्यांना सांगितले. त्यानंतर दहा हजार रुपये घेऊन दीपबंगला चौकात बोलावले. व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, शंकर संपते यांच्या पथकानेही दमदार कामगिरी केली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km