Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
27 Oct, 4:38 PM
more-icon

तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

खडकीतील होळकर पूल नदीपात्रातील उद्यानात प्रकार उघड अशोक बालगुडे पुणे, दि. 27 ः खडकीतील होळकर पूल नदीपात्रात तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल रमेश मंगळवेढेकर (वय ३५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, खडकीतील होळकर पूल परिसरात नदीपात्रातातील उद्यानामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह नागरिकांना पहाटे दिसला. नागरिकांनी या बाबतची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन पोलिसांनी ओळख पटवली. अमोल याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याचा कोणाशी वाद झाला का?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km