Slide 1 of 1
धूमस्टाईलने महिलांचे दागिने चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट-5ची कारवाई
अशोक बालगुडे
पुणे, दि. 27 ः धूमस्टाईलने महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारमाऱ्या चोरट्यांच्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखेच्या युनिट-5ने मुसक्या आवळल्या. आरोपीकडून 66.56 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यातील कार जप्त असा एकूण 29 लाख सात हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विसाम राकेश नानावत (वय 20), बिश्रांत राकेश नानावत (वय 22, दोघे रा. कंजारभट आहिरवाडे रोड, ता. मावळ, जि.पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, तिसरा आरोपी आकाश वजीर राठोड (रा. मुलखेड, लवळे फाटा, ता. मुळशी जि. पुणे) याचा पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तळेगाव एमआयडीसी-2, देहूरोड-2 आणि दिघी-1 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली. तर फरार आरोपी आकाश राठोड याच्यावर तळेगाव-2, कामशेत-1, रावेत-2, चिंचवड-1, पिंपरी-1, चिखली-1, एमआयडीसी-1, सासवड-1, हिंजवडी-5 आणि सुपा-1 असे 16 गुन्हे दाखल असून, बिश्रांत नानावत याच्यावर तळेगाव आणि एमआयडीसी भोसरी, तर विसाम नानावत याच्यावर चाकण पोलीस स्टेसनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.
Tags:
53 Views
Like
Comment
Share