Slide 1 of 1
विद्येच्या माहेरघरात.... हत्ती रूतला, बार सजला अन् बिअरच्या बाटल्या
पुणे विद्यापीठात चाललंय काय?
हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सोंदर्यीकरणाचा शुभारंभ २२ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आला. हे काम कर्वे समाज सेवा संस्था आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
Savitribai Phule Pune University elephant pond beautification project
अशोक बालगुडे
पुणे, दि. 27 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प रखडला असून, भूमिपूजनाच्या दीड वर्षानंतरही प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. ही संधी साधून अंधारामध्ये तलावाच्या ठिकाणची जागा दारू पिण्यासाठी आणि मोकळ्या जागेत पार्ट्या करण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठात हत्ती रूतला, बार सजला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा शुभारंभ २२ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आला. हे काम कर्वे समाज सेवा संस्था आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र आहे. या परिसरात खोदकाम आणि बगिच्याचे प्राथमिक स्वरुपातील काम पूर्ण झाले आहे.
या परिसरात काही कामे सुरू असल्याने, राडारोडा विखुरल्या अवस्थेत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यक्ती दररोज रात्री मद्यपान करीत असून, रिकाम्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे आणि सिगारेट्सची खाली पाकिटे फेकून परिसर घाण करीत आहे. या परिसराच्या आजुबाजूला एनसीसीएसचे कार्यालय, कॉलनी आणि विद्यापीठातील सेवक वसाहतीच्या इमारती आहेत. या संपूर्ण प्रकाराकडे पुणे विद्यापीठात सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनीही लक्ष वेधले आहे. हे काम कधीपर्यत पूर्ण होणार, अशी विचारणाही केली आहे. मात्र या प्रकाराबाबत विद्यापीठाच्या वतीने कोणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
Tags:
Like
Comment
Share