Slide 1 of 1
अपघातानंतर विचारपुस करण्याच्या बहाण्याने मोटारसायकल पळविली
चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
अशोक बालगुडे
पुणे, दि. 27 : बाणेर रस्ता येथील संचार भवन परिसरात मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील तरुण आणि तरुणी खाली पडले. ‘तुम्हाला काही लागले आहे का?’ अशी विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारसायकल चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तुषार कोळेकर मोटारीमधून बाणेर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणी रस्त्यावर पडले. त्यांना काही लागले आहे का? अशी विचारपूस करण्यासाठी कोळेकर यांनी मोटार थांबवून त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तक्रारदारांची कॉलर पकडून त्याच्या अजून दोन साथीदारांना बोलावून घेतले. तक्रारदार यांच्या मोटारीची किल्ली घेऊन त्यांनी मोटार जबरदस्तीने चोरी करून पळवून नेली. पुढील तपास चतुश्रुंगी पोलीस करीत आहेत.
Tags:
Like
Comment
Share