Slide 1 of 1
Rohit Pawar अन्नत्याग.... रोहित पवार म्हणाले आज अन्नाचा कणही घेणार नाही अशोक बालगुडे
अशोक बालगुडे
पुणे, दि. 26 ः मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज (गुरुवार, दि. 26) एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सणसवाडीतील जाहीर सभेत रोहित पवार यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला.
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी रोहित पवार हे पुणे ते नागपूर असा प्रवास करणार आहेत. दसऱ्याच्या दिवसापासून त्यांनी या संघर्ष यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या रोहित पवार यांची यात्रा शिरुर तालुक्यात आहे. या यात्रेतील सभेत रोहित पवारांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं.
'मराठा आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे. असं आरक्षण आपण दिलं पाहिजे. यासाठी एक कार्यकर्ता उपोषणाला बसत असेल तर या ठिकाणी जाहीर करतो की, उद्या दिवसभर अन्नत्याग करणार आहे. उद्या शिरूर तालुक्यातून 20 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा प्रवास करत असताना अन्नाचा एक कणही घेणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
Tags:
52 Views
Like
Comment
Share