Slide 1 of 1
बोलविता धनी कोण.... मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा?
अशोक बालगुडे
पुणे, दि. 26 ः विजयादशमी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेत मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, याचवेळी मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत आम्हाला त्याला शोधावं लागेल, असं सूचक विधान जरागेंनी केलंय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारा बोलविता धनी कोण आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.
Tags:
Like
Comment
Share