Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
26 Oct, 7:27 AM
more-icon

नवले पुल यमदूतच... ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकचालक अटकेत ःसिग्नलला थांबलेल्या वाहनांना सिमेंटने भरलेल्या ट्रकची धडक अशोक बालगुडे पुणे, दि. 26 ः मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ सिग्नलला थांबलेल्या वाहनांना सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर पादचारी महिला जखमी झाली आहे. संदेश बानदा खेडकर (वय ३४ वर्षे, रा. टिळेकर नगर, कात्रज- कोंढवा रस्ता) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे (वय २१, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, नवले पूल परिसरात सिग्नलवर वाहने थांबली होती. बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर, 2023) सकाळी दहाच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगातील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार संदेश गंभीर जखमी झाले, तसेच एक पादचारी महिला जखमी झाली. संदेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतरवाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती सिंहगड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दिली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km