Slide 1 of 1
विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास हाच ध्यास
मनिषा मोडक ः वडकीतील मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्त्री जागर कार्यक्रम
अशोक बालगुडे
पुणे, दि. 24 ः सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी, मराठी संस्कृती तसूभरही कमी झाली नाही. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे संस्थेच्या सचिव मनिषा मोडक यांनी सांगितले.
वडकी (ता. हवेली) येथील संजय मोडक एज्युकेशन संचलित मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'स्त्री जागर' कार्यक्रम झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय मोडक, रूपाली मोडक, मुख्याध्यापिका सारिका शेटे, व्यवस्थापक नारायण गायकवाड, मानव अधिकार राज्य महिला वरिष्ठ सचिव, अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या उपाध्यक्षा कल्पना हांडे, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, गोवा येथे झालेल्या वीरा मल्टीस्पोर्ट अकॅडमीच्या स्पर्धेतील विजेत्या अनुज आंबेकर या खेळाडू पालकांचा 'उत्कृष्ट पालक' म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी गरबा- दांडीया खेळाचा आनंद लुटला. स्त्री जागर कार्यक्रमामध्ये महिला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Tags:
Like
Comment
Share