Slide 1 of 1
ओह प्यार भी... 'कॉलगर्लने 74 वर्षीय आजोबांचे लुटले 30 लाख
अशोक बालगुडे
पुणे, दि. 25 : प्यार भी कभी कभी धोका देता है म्हटलं जातं ते खरंच आहे. 74 वर्षीय पुणेकर आजोबांना कॉल गर्लने सर्व्हिच्या नावाखाली 30 लाख रुपयांना लुटले. झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणत आजोबांनीही कुणालाही सांगितलं नाही. मात्र, अति होऊ लागताच आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये 74 वर्षीय आजोबांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योती बनसोडे हिच्या मार्फत एका 'कॉल गर्ल'ची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. पोलिसांनी त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलीय. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. पोलीस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी पैशांची मागणी केली. आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी 30 लाख 30 हजार रुपये दिले. परंतु दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी आरोपींनी दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत आरोपींनी हे पैसे उकळले आहेत. त्यानंतर आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन महिलेसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.
Tags:
93 Views
Like
Comment
Share