Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
24 Oct, 8:03 AM
more-icon

'दिराशीच' गूळपीठ... भाजपचे हर्षवर्धन पाटील पवार कुटुंबाच्या मंचावर

पुणे, दि. 24 : शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे विखुरलेले तीन सदस्य एकाच मंचावर रविवारी दिसले, त्याच व्यासपीठावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटीलही होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निमित्त होतं ते विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचोलीच्या उद्घाटन समारंभाचं. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही मुख्य राजकीय प्रवाहात नाहीत. मात्र काल ते अचानक पवार कुटुंबीयांसोबत मंचावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दहा वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना ताकद देऊन इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. मात्र, राज्याच्या राजकारणाची समीकरणे मागील काही महिन्यांपासून बदलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झाले. अजित पवार यांच्या गटामधील आमदारांच्या मतदारसंघात दस्तुरखुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकची ताकद लावून ते मतदारसंघ पुढील कालावधीत आपल्या विचाराचे कसे राहतील, यासाठी नवनवी राजकीय समीकरणे आखण्याचे काम रितसर चालू ठेवले आहे. यामध्ये इंदापूर तालुकाही पवार बापलेकीच्या टार्गेटवर आहे. आता थेट भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसताना देखील त्यांना कार्यक्रमाला बोलवून शरद पवारांनी अनोखा इशाराच दिल्याची चर्चा रंगली आहे. हर्षवर्धन पाटलांनी २०१९ ला भाजपप्रवेश करत तिकीट मिळवलं. परंतु तेव्हाही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पक्ष सोडताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, विशेषतः पवार कुटुंबावरच घणाघाती आरोप केले होते. त्यावर बोलताना 'भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता' असा टोमणाही सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km