Slide 1 of 1
काय अजेंडा.... विजयादशमीच्या मुहूर्तावर आज शरद पवारांची पुण्यात सभा
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्य सरकारवर सडकून टीका
अशोक बालगुडे
पुणे, दि. 24 : विजयादशमीच्या मुहूर्तावर आज (मंगळवार, दि. 24 ऑक्टोबर, 2023) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सायंकाळच्या सभेपूर्वी सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या बीड, येवला आणि कोल्हापूर, आंबेगाव येथे सभा घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर प्रथमच पुण्यात युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.
कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला दसऱ्यापासून सुरुवात होणार असून, या निमित्ताने पवार यांची सभा होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी या यात्रेचे आयोजन केले असून, आजपासून पुण्यातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे, तर नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार असून, नागपूर येथील सभाही पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
संघर्ष यात्रेनिमित्त कसबा पेठेतील लाल महाल, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंजपेठेतील महात्मा फुले वाडा या मार्गे पदयात्रा काढली जाणार आहे. संघर्ष यात्रेच्या पहिल्या दिवसाचा समोराप टिळक स्मारक मंदिर येथे होणार असून, त्या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
Tags:
Like
Comment
Share