Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
14 Oct, 4:55 PM
more-icon

ड्रोन क्रांती- कृषी क्षेत्राचे उज्वल भविष्य

डॉ. प्रशांत कुमार पाटील ः महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट प्रशिक्षण अशोक बालगुडे पुणे, दि. 14 ः कृषी क्षेत्रातील भविष्य ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या तंत्रज्ञान प्रसारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असून, त्यासाठी तंत्रकुशल पायलट तयार करण्यासाठी प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केले. कृषि महाविद्यालयामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 'ड्रोन प्रशिक्षण साह्याने उद्योजकता विकास' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, डॉ. रवींद्र बनसोड, प्राध्यापक वर्ग, आत्तापर्यंत प्रशिक्षण घेतलेले ड्रोन पायलट व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक मा. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी विद्यापीठाच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेचा अहवाल सादर केला. डॉ. पाटील म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे ड्रोन पायलट प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले असून, विद्यापीठाने आत्तापर्यंत १०० कुशल ड्रोन पायलट घडविले आहेत. नजीकच्या काळात कृषी विद्यापीठ दहा हजार कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सिंजेंटा फाउंडेशनचे संशोधन अधिकारी विक्रम बोराडे म्हणाले की, सिंजेंटा फाउंडेशनने आत्तापर्यंत ४३० ड्रोन पायलट प्रशिक्षित केले असून, त्यापैकी १०० पायलट हे या विद्यापीठातील आहेत. तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक राज्यातून सुमारे १७००० किलोमीटरची ड्रोन यात्रा काढून १६००० कृषी उद्यमी प्रशिक्षित केल्याचे नमूद केले. डॉ. सचिन नलवडे यांनी सूत्रसंचालन केले.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km