Slide 1 of 1
Bogus Registrants बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यावर कधी होणार कारवाई
बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यावर कधी होणार कारवाई
सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे
अशोक बालगुडे
पुणे, दि. 22 ः हवेली नोंदणी कार्यालय क्र.६, २४, ९ आणि १३ मध्ये फुरसुंगी, लोहगाव, नवी सांगवी, धानोरी परिसरातील बोगस नोंदणीचे प्रकार होत आहेत. कमिशन अँड कंपलीशन ऑर्डर आणि खोट्या एन ए ऑर्डर जोडून दस्त नोंदविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे यांनी सांगितले.
बामणे म्हणाल्या की, ग्रामपंचायत असतानाच्या कालावधीत महापालिकेमध्ये समाविष्ट असल्याचे दाखवून बनावट शिक्क्याचे दस्त बनविले आहेत. दरम्यान, रजिस्टार आणि वकिलांकडे याबाबत विचारले, तर त्यांनी जबाबदारी झटकून टाकली. सामान्य नागरिक घर घेण्यासाठी धडपड करीत आहे. फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांची फसवणूक झाली, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी जनआंदोलन उभा केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
Tags:
62 Views
Like
Comment
Share