Slide 1 of 1
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली
प्राचार्या कालेकर ः चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन
अशोक बालगुडे
पुणे, दि. 22 : कामगार, कष्टकरी, शेतमजूर, हमालांची मुले शिकली पाहिजे. नांगरधारी शेतकरीसुद्धा पदवीधर असला पाहिजे, या भावनेतून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानगंगा पोहोचविली, असे स्पष्ट विचार चं.बा. तुपे साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर यांनी मांडले.
रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य तुळजापुरे, पर्यवेक्षिक नितीन सोनवणे, छाया पवार, मंदाकिनी शिंदे, लाईफ मेंबर लालासाहेब खलाटे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी झांज पथक, लेझीम पथक, एन.सी.सी., गर्ल गाइड, काठी फिरवणे, गाणी, भजन, ओवी, देशभक्तीपर गीत, भारूड असे विविध कार्यक्रम विद्यार्थिनींनी सादर केले.
वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र वाचले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात शिक्षण संस्था उभी केली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिक्षिका पुष्पा देशमुख, विद्यार्थिनी पूर्वा ताकतोडे, संतोषि जंजीरे, फुलपगार तनिष्का, अंजली घाडगे, खुशी गायकवाड, श्रावणी कदम, रिया नामदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आशु तरस, अनुराधा गेजगे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका छाया पवार यांनी आभार मानले.
Tags:
1
76 Views
Like
Comment
Share