Slide 1 of 1
Freestyle लालबागच्या राजाच्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल
दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
अशोक बालगुडे
मुंबई, दि. 22 ः शहरातील सार्वजनिक आणि मानाच्या गणेश मंडळात गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची खच्चून गर्दी आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबाग मंडपातही भक्तांची झुंबड उडाली आहे. पहिल्या घटनेत मंडपातील दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये धक्काबुक्की, तर दुसऱ्या व्हीडिओमध्ये महिलांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी पाहिला मिळाली. गर्दी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र दिसून येतं आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी इथे सेलिब्रिटीसह राजकारण्यांचीही पावले वळू लागली आहेत. या गणरायची ख्याती अख्खा जगात पसरली आहे, त्यामुळे इथे भाविकांची प्रचंड खरेदी होते. गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी इथे असलेले मंडळाचे सेवक आणि पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत असतात. अशातच गर्दीतील भाविकांचे दोन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. तर शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अमित शाहा लालबागमध्ये दाखल होणार आहेत. अमित शाहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनिटं असतील. शाहांच्या दौ-यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरु झालीय. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाहा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही भेट देणार आहेत.
Tags:
Like
Comment
Share