Slide 1 of 1
Crime News बोपदेव घाटात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या लिंगपिसाटावर गुन्हा
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
अशोक बालगुडे
पुणे, दि. 22 : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या लिंगपिसाटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याचा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.
Tags:
118 Views
Like
Comment
Share