Slide 1 of 1
Crime News दरोडा आणि पतीचा हत्येचे पोलीस तपासात बिंग फुटलं
श्रीरामपूरमधील दरोडा प्रकरण ः पत्नीनेच पतीला संपवलं अन् केला बनाव
अहमदनगर, दि. 22 : पत्नीने दरोड्याचा बनाव रचत दरोडेखोरांनी आपल्या पतीची हत्या करत ७ लाखांची रोकड घेऊन लंपास झाल्याचे बिंग पोलीस तपासात उघडकीस आले. एकलहरे (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीला दुधात झोपेच्या गोळ्या देऊन नंतर साडीच्या साह्याने पतीचा गळा आवळून संपवून दरोड्यामध्ये रोकड लंपास झाल्याचा बनाव केला होता.
पोलिसांनी सांगितले की, २१ सप्टेंबर रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास कोल्हार रोड, एकलहरे शिवार येथे नईम रशिद पठाण यांचे घरी दरोडा पडला असुन त्याचे घरुन सात लाख रु. रोख रक्कम व काही दागिने चोरी गेले आहेत, सदर दरोड्यामध्ये नईम पठाण यांना साडीच्या साहयाने गळफास लावुन जिवे ठार मारले आहे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे तरी तात्काळ मदत पाठवा, असा श्रीरामपुर पोनि. हर्षवर्धन गवळी यांना कॉल आला. पोनि. गवळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ तपास पथक व अधिकारी अंमलदार याचेसह सदर घटनास्थळी जावुन पाहणी केली आणि जखमींना तात्काळ औषध उपचाराकरीता पाठवून दिले.
दरम्यान, घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं.१०१४/२३ भादंवि ३९४,३९६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण करुन तसेच सदर दरोड्यात मयत झालेला नईम रशिद पठाण याची जखमी पत्नी हिचे जाब जबाब घेतले. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरोडा नसून मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा नईम पठाण (रा.एकलहरे) हिने केला असल्याची माहिती मिळाली. मयत नईम रशिद पठाण याचा अंत्यविधी होताच चौकशीसाठी ताब्यात घेतले. मयताची पत्नी महिला बुशरा नईम पठाण हिच्याकडे सखोल तपास केला असता तिने प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती सांगून पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला उडवाडवीची उत्तरे दिली. सदर महिलेस पोलिसांनी विश्वासात घेवून विचारपुस केली असता, तिने माझा पती नईम रशिद पठाण हा मला सुमारे पाच ते सात वर्षापासुन नेहमी सेक्स्युएल टॉर्चर करत होता, याच रागातुन मी माझे पती नईम पठाण याच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून त्यास गुंगी आल्यानंतर साडीचे एक टोक घराचे खिडकीचे गजास बांधुन साडी त्याचे गळ्यास आवळुन साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढुन त्याला जीवे ठार मारले आहे. आमचे
Tags:
76 Views
Like
Comment
Share