Slide 1 of 1
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये खेळांना प्राधान्य द्यावे
प्रा. कविता आल्हाट ः महंमदवाडीतील डॉ. दादा गुजर विद्यालयात बक्षीस वितरण
अशोक बालगुडे
पुणे, दि. 22 ः विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये विविध खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के राखीव जागा आहे. मैदानी खेळामुळे तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असे विचार राष्ट्रीय खेळाडू कविता आल्हाट यांनी मांडले.
महंमदवाडी येथील डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. एम. पाटील, पर्यवेक्षिका सीमा बेल्हेकर, राजश्री पाटील, भाग्यश्री फड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कांबळे, शिक्षक पालक संघाच्या सीमा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आणि विभागीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये आठवी ते दहावीतील 104 विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. त्या सर्व विद्यार्थ्यांना आल्हाट यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
मीनल भोरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडाप्रमुख सुरेश रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी गोरे यांनी आभार मानले.
Tags:
Like
Comment
Share