Slide 1 of 1
हडपसरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे रविवारी आंदोलन
अशोक बालगुडे
पुणे, दि. 21 ः ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, ओबीसीचे जातीनिहाय जनगनणा व्हावी, यासाठी ओबीसी आरक्षण बचाव समिती हडपसर विधानसभा मतदारंसघाच्या वतीने रविवारी (दि. 24 सप्टेंबर, 2023) सकाळी 10 वाजता हडपसरमधील राजमाता जिजाऊ चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महेंद्र बनकर यांनी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, सोनल कोद्रे, वैष्णवी सातव, पंढरीनाथ बनकर, हनुमंत पांचाळ, उद्धव पांचाळ, अण्णा धायगुडे, स्मिता गायकवाड, मोहन चिंचकर, संतोष शिंदे, राजेंद्र ओरसे, भालचंद्र टेंभुर्णीकर, प्रीतेश गवळी आदी ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आरक्षण बचाव समितीच्या वतीने ओबीसी समाजातील नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार मुकेश वाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
Tags:
63 Views
Like
Comment
Share
1 comment
Ganesh Wadkar
ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लावू नये जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे जनगणना झालीच पाहिजे