Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
21 Sep, 6:42 PM
more-icon

बापरे... महिलेवर अत्याचार होताना नागरिकांची बघ्याची भूमिका

डोंबिवलीतील भयानक प्रकार ः अशोक बालगुडे मुंबई, दि. 21 ः सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील कुंभार खान पाडा येथे रिक्षामध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार होताना नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दिनेश गडारी याला अटक केली असून, त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत महिला राहते. पीडित दाम्पत्य राहते घर सोडण्याच्या तयारी होते. या जोडप्याने आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत महिला आणि तिचा पती हे त्यांचे सामान आणण्यासाठी गेले होते. या दोघांच्या ओळखीचे दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत महिलेच्या पतीला दारु आणण्याकरता सांगितले. तिचा पती दारू आणण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर बलात्कार केला. ती कशीबशी घराबाहेर निघाली आणि पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोंबले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला मदतीची याचना करत होती. मात्र सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल. पीडित महिलेचा पती दारू घेऊन मित्राच्या घरी परतला तेव्हा तिने पतीला तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमध्ये चाललंय तरी काय असा असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Tags:  
182 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km