Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
21 Sep, 6:34 PM
more-icon

अरे बापरे... प्रॉपर्टीसाठी महिलेची साडी चोरून जादूटोणा

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये सहाजणांवर गुन्हा ः अशोक बालगुडे पुणे. दि. 21 : मालमत्तेसाठी जादूटोणा आणि अघोरी कृत्य करणाऱ्या मांत्रिकासह सहाजणांवर चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांता सुरेश चव्हाण (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघे रा. जनवाडी, गोखलेनगर), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्नील सुपेकर (वय २३), सोनल प्रवीण सुपेकर; तसेच मांत्रिक स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर (वय २८, रा. जनवाडी) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी अनिकेत, त्याची आजी कांता चव्हाण जनवाडी भागात राहतात. अनिकेतच्या वडिलांनी दुसरा विवाह केला आहे. त्याची सावत्र आई कोथरूड भागात राहते. अनिकेतच्या पणजीच्या नावावर दोन खोल्या आहेत. मालमत्तेवरून अनिकेत आणि आरोपींमध्ये वाद सुरू होते. अनिकेतच्या आईची साडी चोरीला गेली होती. अनिकेतने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आजी कांता आणि एका तरुणीने साडी चोरल्याचे दिसून आले. अनिकेत आजीच्या खोलीत गेला तेव्हा आई, काकू, मावशी यांची छायाचित्रे ठेवलेली त्याला दिसली. चोरलेल्या साडीजवळ टाचण्या लावलेले लिंबू ठेवले होते. मांत्रिक स्वप्नील भोकरे मंत्रोच्चार करीत होता. अनिकेतने याबद्दल विचारणा केली असता, ‘आम्ही तुम्हाला मारून टाकणार आहोत,’ अशी धमकी त्याला देण्यात आली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.
breaking
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km