Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
21 Sep, 6:21 PM
more-icon

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ः पुणे, दि. 21 ः ज्येष्ठ महिलेवर दबाव आणि वंध्यत्वाचा फायदा घेऊन बजाज युनिव्हर्स कंपनीचे एकूण 3600 शेअर्स खोटी सही करून घेत एक कोटी 64 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय राजाराम भडकवाड (वय 30, रा. सुखसागरनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साईराज श्रॉफ (वय 62, रा. वानवडी, पुणे) यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार श्रॉफ यांच्या मावशी अर्नी दिनशा शेठ (मयत) या नाना पेठ परिसरात राहण्यास होत्या. सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये त्यांच्याकडे आरोपी अजय भडकवाड हा चालक म्हणून नोकरी करत होता. आरोपीने शेठ यांच्या वंधत्वाचा फायदा घेऊन त्यांच्यावर दबाव आणून तक्रारदार व अर्नी शेठ यांच्या नावावर जनता सहकारी बँक लिमिटेड येथील डिमॅट अकाउंट खात्यामधून बजाज फिनिवहरस कंपनीचे एकूण 3600 शेअर्स त्यांच्या संमतीशिवाय तक्रारदार यांची खोटी सही करून सदर रकमेपैकी एक कोटी 64 लाख रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तसेच अर्नी शेठ यांच्या निधनानंतर त्यांचा लॅपटॉप ,मोबाईल ,त्यांचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू तक्रारदार यांच्या संमतीशिवाय परस्पर घेऊन गेलेला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम त्रंबके पुढील तपास करत आहे.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km