Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
21 Sep, 5:10 PM
more-icon

ऑर्डरला उशीर झाल्याचे कारण देत लुबाडणारे जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई ः पुणे, दि. 21 ः ऑर्डरला उशीर झाला पैसे देणार नाही, असे म्हणत झोमॅटोमध्ये पार्टटाईन डिलिव्हरी करणाऱ्याला रात्रीच्या वेळी लुबाडणाऱ्या तिघांना अटक केली. अरुण दिगंबर राऊत (वय 20) आणि कुणाल कैलास गायकवाड (वय 20, दोघेही रा. पवारआळी, फुरसुंगी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आला. याप्रकरणी नितेश कांबळे (वय 23) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, झोमॅटोद्वारे जेवणाची ऑर्डर मागवून ऑर्डरला उशीर झाला, तुला पैसे देणार नाही, असे सांगत तिघांनी पाच हजार 200 रुपये, रेडमी कंपनीचा मोबाईल काढून घेतले, दोन हजार 880 रुपये ऑनाइन घेऊन लुबाडणारे फुरसुंगीत थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. आरोपीकडून 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन कोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रशीद शेख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km