Slide 1 of 1
सातवनगरमधील अक्षय आर्टमध्ये गणेशभक्तांची गर्दी
अशोक बालगुडे
पुणे, दि. 19 ः कोंबडं आरवलं, पहाट झाली अन् सुंदर आकर्षक रांगोळी आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट, सोनेरी किरणांच्या वर्षावात घरोघरी श्रींचे आगमन सुरू झाले. श्रींचे आगमन आबालवृद्धांना समाधानाची पर्वणीच... श्रींच्य पाठोपाठ गौराईचेही आगमन होईल आणि घरोघरी आनंदाचे भरते आलेले पाहायला मिळाले. हडपसर-हांडेवाडी रस्ता (सातवनगर) येथील अक्षय आर्ट श्रींच्या कारखान्यामध्ये आज भल्या पहाटेपासून श्रींची मूर्ती घेण्यासाठी गर्दी झाली होती. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा गणेशभक्तांचा उत्साह काही औरच होता, असे अक्षय आर्टचे दिलीप निघोल यांनी सांगितले. याप्रसंगी कलाकार अक्षय निघोल, रश्मी निघोल, सायली निघोल, प्रवीण नागभिडे, प्रिया कांबळे, सरला कांबळे, शालिनी शेळके, हेमेंद्र पाटील, धनंजय मोकल, नयना नागभिडे, उज्ज्वला सोनवणे, अंकिता साळुंके आणि गणेशभक्त अजिंक्य तवर, मनोज बालगुडे कुटुंबीय उपस्थित होते.
नवचैतन्य, उत्साहाचे उधाण, आनंदाचा आणि एकात्मतेचा सण म्हणजे गणेशोत्सव. कुशल, कलासक्त हातांनी श्रींची सजावट, अनोखा साज असा बहारदार गणेशोत्सव खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय बनत आहे. त्या गणरायाचे आगमन झाले. शहर-उपनगर आणि ग्रामीण भागातही आज भल्या पहाटेपासून गृहिणींची लगबग सुरू झाली. नोकर भगिनींनी काल रात्रीच श्रींची सजावट करून ठेवत आज संकष्टी चतुर्थीला श्रींची पूजाअर्चा करून कार्यालयाकडे धाव घेतली. घरच्या श्रींची प्रतिष्ठापना करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक श्रींच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू केलेली ठिकठिकाणी पाहायला मिळाली. ढोल-ताशा, लेझीम, डीजे असा काही भारीच डामडौल दिसू लागला आहे. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही रस्त्यात गर्दी करू नका, शांततेत श्रींची प्रतिष्ठापना करा असा सबुरीचा सल्ला गणेशभक्तांना दिल्याचे दिसून आले.
Tags:
1
52 Views
Like
Comment
Share