Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
19 Sep, 5:46 PM
more-icon

बापरे... जन्मदात्या वडिलांची हत्या करणारा दिवटा अटकेत

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः हल्ल्यामध्ये आईही झाली जखमी पुणे, दि. 19 ः गणेशचतुर्थीला पुण्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहेत. जन्मदात्या बापावर झोपेत कात्रीने हल्ला करून हत्या करणाऱ्या दिवट्या मुलाला पोलिसांनी अटक केली. या हल्ल्यात आईहीही जखमी झाली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय 55, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय -20) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय 36, रा. टिंगरेनगर, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिवनाथ सध्या शिक्षण घेत नव्हता तसेच कोणता कामधंदे करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला वडिलकीच्या नात्याने सांगितले होते. मात्र, मध्यरात्री लक्ष्मण मंजुळे हे गाढ झोपेत होते. त्यावेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील धारदार कात्रीने छाती आणि पोटावर अचानक जीवघेणा वार केले. या हल्ल्यामुळे पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची दुसऱ्या खोलीत झोपलेली आई झोपेतून जागी झाली. त्यावेळी आईने पतीला वाचिण्यासाठी धडपड केली असता, शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. शिवनाथला अटक करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे पुढील तपास करत आहेत.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km