Slide 1 of 1
परदेशी नागरिकाला फसवणाऱ्या भामट्या पोलिसावर गुन्हा
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
पुणे, दि. 19 ः येमेन येथून औषोधोपचारासाठी पुण्यात आलेल्या नागरिकाला तीन लाख 20 हजार रुपयांना फसविणाऱ्या भामट्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अब्दुल फाताळ सालेह मोहसेन (वय-48, सध्या रा. कौसरबाग कोंढवा, पुणे, मूळ येमेन) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी कौसरबाग येथे घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार 15 दिवसांपूर्वी औषोधोपचारासाठी येमेन येथून पुण्यात आले आहेत. फेर फटका मारण्यासाठी ते कौसरबाग येथे आले होते. यावेळी एक जण त्यांच्या जवळ आला आणि त्याने आय कार्ड दाखवून पोलिस असल्याचे सांगितले. तोतया पोलीसाने तक्रारदार यांच्याशी अरबी भाषेत बोलून त्यांच्याकडे असणारे ४ हजार डॉलर तपासणी करायचे आहे असे सांगून ते घेऊन गेला. तक्रारदार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.
Tags:
Like
Comment
Share