Slide 1 of 1
पुणे-चाकण बसमध्ये तरुणीचा विनयभंग करणारे जेरबंद
बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
पुणे, दि. 19 ः चाकणवरून पुण्याच्या दिशेने बस प्रवास करत असलेल्या 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. प्रभात कुमार तिवारी (वय 26, रा. चाकण, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वीस वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित तरूणी तिच्या मैत्रिणीसोबत बसने भोसरी ते पुणे स्टेशन असा प्रवास करत होती. त्यावेळी बस मध्ये तिच्या मागे उभा राहून, आरोपी तरुणाने जाणून बुजून तिच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून तरुणीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य प्रभात कुमार तिवारी या तरुणानी केले.तसेच तरुणी पुणे स्टेशन येथे उतरल्यानंतर तिच्या मागे जाऊन तिचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही जाधव पुढील तपास करत आहे.
Tags:
Like
Comment
Share