Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
19 Sep, 5:31 PM
more-icon

दादांच्या गटाची राज्यभर निदर्शने : पडळकरांची भाजपमधून हकालपट्टी करा

दादांच्या गटाची राज्यभर निदर्शने : पडळकरांची भाजपमधून हकालपट्टी करा पुणे, दि. 19 ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने राज्यभर जोडे मारो आंदोलन करीत निदर्शने करीत आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी करण्यात आली. आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला. नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या बाहेर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, आदित्य गव्हाणे, संदीप गांगुर्डे, अशोक पाटील, राज रंधवा, अथर्व निसाळ, आशुतोष चव्हाण, आकाश म्हस्के, ज्ञानेश्वर महाले, किरण चौधरी, गणेश हांडोरे, संतोष अढागळे, हर्षल इतापे, गणेश पगार, विकी वाळके, सुयश मेणे, पराग गांगुर्डे, राजेश हाडपे, समाधान महाले उपस्थित होते. बीडमध्येही कार्यकर्ते भडकले बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तसेच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला. पडळकर दिसेल तिथे धुणार... पुण्यातील कार्यकर्त्यांनी देखील असेच रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने फाटा येथे आंदोलन केले. पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथे त्यांना आम्ही चोप देऊ, अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली. सुप्रिया सुळेंवरही टीका आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे. धनगर समाजाने आतापर्यंत तुमच्या पालख्या उचलल्या लोकांच्या चपला फाटल्या तरीही तुमच्या बापाने, भावाने पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिलं नाही. त्यामुळे तुम्हाला आता धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आरक्षणावर काम करतायेत. येत्या दोन महिन्यात आरक्षणप्रकरणी निकाल येईल, असं पडळकर म्हणाले.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km