उंड्री जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले इको फ्रेंडली बाप्पा
पुणे, दि. 18 ः गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता चिमुकल्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. उंड्री जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली श्रींची मूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून श्रींची मूर्ती बनविण्याचे धडे गिरविले. तसेच, श्रींची सजावटही पर्यावरणपूरक बनविण्याचे प्रात्यक्षिक शिकून घेतले. उपशिक्षिका अर्चना राजेंद्र कुंभारकर, पुनम वेदपाठक सीमा आदलिंगे, सुरेखा नागवडे, भूप्रिया नडे, माधव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Tags:
2 Comments
Like
Comment
Share
2 Comments
Rajendra Kumbharkar
खूपच छान सर
Seema Khune
खूपच छान