Slide 1 of 1
पुणेरी नायक उपक्रमांतर्गत पेशवे तलाव केला स्वच्छ
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम ः
पुणे, दि. 18 ः स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग पुणेरी नायक उपक्रमांतर्गत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नानासाहेब पेशवे तलाव परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यावेळी एक हजार 200 किलो सुका कचरा जमा करण्यात आला.
पालिका घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त संदीप कदम यांचे आदेशानुसार परिमंडल-4चे उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत नानासाहेब् पेशवे तलाव परिसरामध्ये स्वच्छता रॅली काढण्यात आली. या उपक्रमामध्ये ज्ञानेश प्राथमिक विद्यालय, सरहद स्कूल, वेंकटेश माध्यमिक विद्यालय, मनपा शाळा क्र.२१४, ९४-जी, १७२, १०६-बी, १८४.१८५-बी, श्रीराम राज्य माध्यमिक विद्यालय, एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, हिरामण बनकर शाळा, पुष्पा इंटरनॅशनल स्कूल, हरी ओम ग्रुप कात्रज, कात्रज जेष्ठ नागरिक संघ, शिवपुत्र ढोल ताशा पथक, व्हीआयटी कॉलेज, स्वराज कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स, पीआयसीटी कॉलेज, लव शेअर फाउंडेशन, वाईल्ड ऍनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायट्यांमधील सभासदांनी पेशव तलाव परिसर स्वच्छ केला. तसेच, स्वच्छ संस्थेचे ब्रँड अँबेसिडर सुनीता नेराळे, विक्रांत सिंग, सहायक आयुक्त प्रकाश पवार, उपभियांता दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, राजू दुल्लम, विक्रम काथवटे, सुनील मोहिते, आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांसह एक हजार 1800 नागरिकांनी सहभाग घेतला.
Tags:
1
Like
Comment
Share