Slide 1 of 1
एकेकाचा मुडदा पाडू महणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
हडपसर पोलिसांची कामगिरी ः तीन अल्पयवीन घेतले ताब्यात
अशोक बालगुडे
पुणे, दि. 18 ः आमच्याशी पंगा घ्याल, तर एकेकाचा मुडदा पाडू असे म्हणत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवित खून करणाऱ्यांना अटक केली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. सनी रावसाहेब कांबळे, (वय 25) अमन साजिद शेख (वय 22), आकाश हनुमंत कांबळे (वय 23, रा. सर्व रा. मिरेकरवस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे (वय 17) असे खून करण्यात आलेल्याचे नाव असून, विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय 17) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पूर्ववैमनस्यातून आरोपीने फिर्यादीच्या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. यावेळी सनी कांबळे व अमन शेख यांनी धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून आमच्या सोबत कोणी पंगा घेतला, तर असाच एका एकाचा मुडदा पाडू असे धमकावत पळून गेले. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन चार तासांत अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर करीत आहेत.
Tags:
Like
Comment
Share