Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
18 Sep, 9:46 AM
more-icon

एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ः पुणे, दि. 18 : एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. विशाल छबू पल्हारे (वय २०, रा. हांगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. नगर), आदित्य प्रदीप रोकडे (वय २०, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे), अनिकेत संजय शिंदे (वय २०, रा. बोरी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी चोरट्यांचा साथीदार आदित्य खोमणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात स्फोट घडवून एटीएममधील रोकड चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी सांगितले की, यवत परिसरातील पारगाव येथील एका बँकेच्या एटीएमध्ये स्फोट घडवून रोकड चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. एटीएममधील रोकड बाहेर न पडल्याने चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चोरी, तसेच स्फोटके अधिनियम कायदा १९०८ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांना सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक हेमंत शेडगे, राहुल गावडे, गणेश जगदाळे, तुषार पंधारे, हवालदार सचिन घाडगे, जनार्दन शेळके, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km