Slide 1 of 1
गांधी चौकातील शौचालयाच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर मजूर अड्ड्यावरील नागरिकांची तक्रार ः हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून तक्रारीला केराची टोपली अशो
गांधी चौकातील शौचालयाच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मजूर अड्ड्यावरील नागरिकांची तक्रार ः हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून तक्रारीला केराची टोपली
अशोक बालगुडे
पुणे, दि. 18 ः हागणदारीमुक्त गाव अशी संकल्पना राज्यभर राबविली जात आहे. पुणे शहर आणि उपनगरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हडपसर गांधी चौकातील उड्डाण पुलाखाली महिला-पुरुषांच्या शौचालयातील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही तेथे विद्युत दिवे आणि स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार उड्डाण पुलाखाली थांबलेल्या मजूरांनी केली.
गांधी चौकातील उड्डाण पुलाखाली शौचालयातील दुर्गंधीयुक्त पाणी वारंवार रस्त्यावर वाहते, त्यामुळे नाकाला रुमाल लावून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. याच मोठ्या प्रमाणात महिला-पुरुष मजुर रोजगारासाठी दररोज सकाळी थांबतात. याच चौकामध्ये वाहतूक पोलीस नियमन करतात, दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. पालिका प्रशासनाने स्वच्छतागृह नागरिकांच्या सोयीसाठी की ठेकेदारासाठी उभारले आहे, स्वच्छता करण्याचे काम एजन्सीला दिले असले तरी त्याची पाहणी करण्याची जबाबदारी पालिकेची नाही का, प्रत्येक नागरिक ऐनकेन प्रकारे प्रशासनाला कर भरतो, त्या कराच्या रकमेतून सार्वजनिक व्यवस्था उभी केली जाते. त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी पालिका अधिकारी की नागरिकांची आहे. लाखो रुपयांचे टेंडर फक्त ठेकेदारासाठी आहे की काय अशी विचारणा महेंद्र बनकर यांनी केली आहे.
बनकर म्हणाले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदन आणि तोंडीसुद्धा या स्वच्छतागृहाच्या स्च्छतेविषयी तक्रार केली आहे. मात्र, अद्याप अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील म्हणाले की, आरोग्य अधिकारी आणि एजन्सीची चौकशी करून स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेविषयी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share