अभियंता, संरक्षण, उपग्रह क्षेत्रात जगात भारत अव्वल
प्राचार्य नीलेश उके ः अभियंता दिनानिमित्त इस्रोचे विशेष कौतुक कार्यक्रम
अशोक बालगुडे
पुणे, दि. 17 ः अभियंता, संरक्षण, उपग्रह अशा अनेक क्षेत्रात भारताने जगामध्ये अग्रक्रमांक पटकावला आहे. अभियंता तरुणांकडून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक आशा आहेत, त्या पूर्ण होतील, असे स्पष्ट विचार ट्रिनिटीचे प्राचार्य नीलेश उके यांनी मांडले.
ट्रिनिटी अकादमी ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेकम्युनिकेशन विभागाने 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औजित्या साधून चंद्रयान-3च्या यशस्वीतेसाठी इस्रोचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी E&TC च्या विद्यार्थ्यांनी चंद्रयानवर अनेक पोस्टर आणि मॉडेलचे प्रदर्शन करीत शब्दरचना केली. याप्रसंगी विभागप्रमुख प्रो. दीप्ती कुलकर्णी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केजेईआयचे संचालक मेजर जनरल समीर कल्ला यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पार्श्वभूमीवरील विद्यार्थ्यांना तांत्रिकतेमध्ये काम करण्यास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच, केजेईआयचेचे अध्यक्ष कल्याण जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना आत्मसात कराव्यात, असे सांगितले.
Tags:
Like
Comment
Share