Slide 1 of 1
Accident News बापरे... दिवे घाटात टेम्पो पलटी झाल्याने कामराचा मृत्यू
बापरे... दिवे घाटात टेम्पो पलटी झाल्याने कामराचा मृत्यू
टेम्पोचालकावर गुन्हा ः जखमींना सासवड येथील जिल्हा उपरुग्णालयात हलविले
अशोक बालगुडे
पुणे, दि. 17 ः सासवडवरून पुण्याकडे येणारा टेम्पो दिवे घाटात पलटी झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. छोटू दिल्लू कोल (वय 25, रा. गोपाळपुरा, मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक सूरज रामभाऊ चौधरी (वय 22, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात आज (रविवार, दि. 17 सप्टेंबर, 2023) सकाळी साडेआठच्या सुमारास दिवे घाटातील दुसऱ्या वळणावर झाला.
अपघाताचे वृत्त समजताच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक धनंजय दाभाडे, पोलीस हवालदार महेश भोंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने सासवड येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातामुळे बघ्यांच्या गर्दीने वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने जखमींना सासवड उपजिल्हा रुग्णालयात हलविले आणि वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अग्निशमनचे अधिकारी गायकवाड म्हणाले की, आर.सी.सी. स्लॅब टाकण्यासाठीचे साहित्य व कामगारांना घेऊन टेम्पो सासवडवरून पुण्याकडे येत होता. दिवे घाटातील दुसऱ्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.
Tags:
255 Views
Like
Comment
Share