Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
17 Sep, 4:19 PM
more-icon

बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा पाहा 'हा' फोटो

अशोक बालगुडे पुणे, दि. 17 ः गणपती बाप्पा मोरया... म्हटलं की नवचैतन्य, उत्साह आणि आनंदाला पारावार नाही... गणपती येणार म्हटलं की प्रत्येकाच्या मनात वेगवेळ्या भावनांचा काहूर माजतो. बाप्पाच्या उत्सवातील गर्दी, गोंगाटही प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. उत्सवाच्या बदलणाऱ्या रुपाविषयी मतमतांतरे मांडणारी मंडळी आहेत. विचारांच्या वाटेवर तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे वाटसरु आहात हे एव्हाना उमगलंच असेल. याच गणेशोत्सवाचा एक कायमस्वरुपी भाग म्हणजे आठवणी.... गणेशोत्सवाच्या निमित्तानं मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेकड्यानं रील्स, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच एक फोटो अनेकांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीपासून अगदी व्हॉट्सअप स्टेटरपर्यंतही ठेवला आहे. काहींनी तो रिशेअर केला आहे. Ganesh Vanare या छायाचित्रकारानं हा फोटो टीपला असून, त्यानं इन्स्टाग्रामवर तो शेअरही केला. हा फोटो इतका बोलका आहे की त्यातील निरागसता पाहताक्षणी लक्षात येते. गणेशोत्सव सुरु व्हायला आता काही तास उरलेले असतानाच हा फोटो समोर आला जिथं एक आजीबाई आणि त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव नजर खिळवून ठेवणारे होते. छायाचित्रकारानं हा फोटो इतक्या शिताफीनं टीपला की आजींच्या मागं गणेशमूर्ती असून, त्या मुर्तीच्या भुजा आजीबाईंच्या पाठून अशा दिसत आहेत जणू बाप्पानंच त्यांना पाठबळ दिलं असावं. बाप्पाचा मुकूट, त्याचं सिंहासन, मोठे कान आणि आशीर्वाद देणारा हात इतकंच काय ते दिसत असून, आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. हा फोटो प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट सांगणारा, वेगळ्या आठवणी जागवणारा आणि तितकाच खास. फोटोच्या निमित्तानं गणपती बाप्पा तुमच्याआमच्या पाठीशी कायमच असतो हीच भावना मनात घर करून जाते आणि नकळतच आपणही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km